कंळबा परिसरात फाळकुट दादाची दहशत.

   भरचौकात तरुणावर हल्ला करून काही वाहनांची तोडफोड.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- कंळबा परिसरात एका सराईत फाळकूट टोळीने सोमवारी रात्रीच्या सुमारास गोंधळ घालून मोठी दहशत माजवली.दुचाकी वरुन आलेल्या तरुणाला अडवत त्याला मारहाण करून काही वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे.

हा उपद्रव त्या टोळक्यांचा रात्री उशिरापर्यंत चालू होता.यातील काही जणांच्यावर करवीर पोलिस ठाण्यासह जुना राजवाडा पोलिस ठाण्यातही गंभीर स्वरुपाचे गुन्हें दाखल असल्याचे समजते.या परिसरात फाळकूटांचा उपद्रव वाढ़ल्याने नागरिकाच्यात भितीचे वातावरण पसरत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.हद्दीतल्या कारवाई करणारयांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने या सराईत टोळक्यांचा उपद्रव वाढ़त आहे.या रोजच्या घटनेने छोटे मोठे भेदरलेले दिसून येत आहे. तसेच रविवारी रात्री ही पाच-सहा जणांच्या टोळक्याने या परिसरातील साई मंदीर परिसरातही धुमाकुळ घालत हातात काठ्या आणि लोखंडी सळ्या  हातात घेऊन तेथे असलेल्या काही वाहनांची तोडफोड करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणारयांलाही मारहाण करून आरडा ओरडा करून मोठमोठ्याने शिवीगाळ करत होते.

या वेळी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिस आल्यावर माघारी गेले .परत पोलिस गेल्यावर पुन्हा दहशत माजवून धिंगाणा घालू लागले.तसेच दुचाकीवरुन आलेल्या तरुणाला अडवत त्याला मारहाण करु लागले त्या तरुणाने आपली कशीबशी सुटका करून पळ काढ़ला असता त्याचा पाठलाग केला.शहरासह उपनगराबरोबर ग्रामीण भागातील सराईतासह तडीपार झालेले गुंडाचा उपद्रव वाढ़त असल्याचे दिसते -मध्यवर्ती चौकासह तेथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेज पाहून अशा टोळक्यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्यातुन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post