प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-राज्य उत्पादन शुल्कचे राजाराम खोत यांची अहमदनगर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर शहर विभागाचे उपअधीक्षक म्हणून युवराज शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला.
येणारी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने होम टाऊन असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्वच अधिकारयांची जिल्हा बदली करण्यात आली .त्यांच्या जागी बाहेरुन बदलुन आलेल्या अधिकारी वर्गाची नियुक्ती सुरु असल्याचे या विभागाचे अधिक्षक रविंद्र आवळे यांनी सांगितले.शिंदे हे 1998 साली उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते.ते मुळचे लातुर जिल्हयातील असून त्यानी कोल्हापूरसह ठाणे,वर्धा,नागपूर ,यवतमाळ,पुणे येथे सेवा बजावून परत त्यांची पुणे येथुन कोल्हापुरात बदली झाली आहे.त्यांनी गोवा बनावटीच्या अड्यावर छापे टाकून राज्य शासनाचा महसुल वाढ़वण्याचा प्रयत्न करून त्याच बरोबर गोवा बनावटीची अवैद्य मद्याची होत असलेली तस्करीस आळा घालणार असल्याचे सांगितले.