प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
कोल्हापूर, : विकसित भारत संकल्प यात्रा प्रभावीपणे राबवून केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 14 योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सहकार्याने ज्या योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शासन स्तरावर विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम देशव्यापी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. या संकल्प यात्रा मोहिमेचा दुसरा टप्पा मंगळवार, दि. 6 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कोल्हापूर शहरात राबविण्यात येत आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक प्रक्रियेत आणण्यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या यात्रेचे नियोजन प्रत्येक शहरात, गावागावात केले जात आहे. विकसित भारत संकल्प यात्रा ही सर्वसामान्य घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा कार्यक्रम आहे.
यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देणे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेत प्रशासनाबरोबर पदाधिकाऱ्यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे ठिकाणी चित्ररथ फिरणार आहे. यामध्ये दि.6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात छ.शिवाजी स्टेडियम- सावित्रीबाई फुले हॉस्पीटल व दुपारच्या सत्रात फिरंगाई प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात राजारामपूरी 9 वी गल्ली आरोग्य केंद्र व दुपारच्या सत्रात पंचगंगा रुग्णालय, दि.8 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात कसबा बावडा आरोग्य केंद्र व दुपारच्या सत्रात महाडीक माळ आरोग्य केंद्र, दि.9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात जवाहरनगर विर ककैय्या व दुपारच्या सत्रात फुलेवाडी आरोग्य केंद्रे, दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात लक्षतीर्थ वसाहत आण्णासो शिंदे शाळा व दुपारच्या सत्रात आपटेनगर-राजोपाध्येनगर आरोग्य केंद्र, दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात कपूर वसाहत पाण्याची टाकी व दुपारच्या सत्रात दौलतनगर तीन बत्ती चौक, दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात सदरबाजार आरोग्य केंद्र व दुपारच्या सत्रात राजारामपूरी जगदाळे हॉल, दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात सिध्दार्थ नगर आरोग्य केंद्र व दुपारच्या सत्रात मोरे-मानेनगर आरोग्य केंद्रे, दि.14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात धोत्री गल्ली केएमसी कॉलेज व दुपारच्या सत्रात पितळी गणपती आपला दवाखाना, दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात कनान नगर एस्तर पॅटर्न शाळा व दुपारच्या सत्रात पांजरपोळ महावितरण कार्यालय, दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात खोल खंडोबा पदमाराजे शाळा व दुपारच्या सत्रात विक्रमनगर आरोग्य केंद्र येथे होणार आहे.