प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कदमवाडी परिसरात असलेल्या कपूर वसाहतीत सकाळच्या सुमारासएका घरात ग्यस लिकेज होऊन आग लागल्याची दुर्घटना घडली असून एक जण जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे कर्मचारी तात्काळ रवाना झाले.तत्पुर्वी अग्निशामन दलाचे ठोक मानधन वरील फायरमन सुनिल यादव ड्युटीवर नसताना सुध्दा या घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारच्या शाळेतील फायर एक्सटींग्युशरच्या मदतीने आग आटोक्यात आणली.त्याच बरोबर स्वतःचा जीव धोक्यात घालून लिकेज झालेले दोन सिंलेंडर घराच्या बाहेर काढ़ले.त्यामुळे होणारी जिवितहानी टळली.त्याच्या या धाडसामुळे त्या परिसरात नागरिकांच्या कडुन कौतुक होत आहे.