प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- उद्या होणारया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज पोलिसांनी रुट मार्च काढ़ण्यात आला .हा रुट मार्च राजवाडा पोलिस ठाणे मार्गावरुन बिनखांबी गणेश मंदीर ,महाद्वाररोड ,पापाची तिकटी ,माळकर तिकटी ,छत्रपती शाहू महाराज चौक ,महानगरपालिका,अकबर मोहल्ला ,स्वंयभू गणेश मंदीर या मार्गावर काढ़ून लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे येथे समाप्त करण्यात आला.
यावेळी शहर डीवायएसपी अजित टिके यांच्यासह लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार ,जुना राजवाडाचे संजीवकुमार झाडे ,शाहुपुरीचे अजयकुमार सिंदकर ,करवीरचे किशोर काळे आणि राजारामपुरीचे अनिल तनपुरे यांच्यासह 10 पोलिस अधिकारी,60 पोलिस अंमलदार ,एसआरपीएफचे दोन प्लाटून,एक स्ट्रायकिंग व 30 होमगार्ड यांचा समावेश होता.