प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- शनिवार पेठ येथील अपार्टमेट मध्ये रहात असलेल्या वरपे यांना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वरपे यांच्या घरी जाऊन भेट घेतली.क्षीरसागर यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही.असा प्रश्न दानवे यांनी करून पोलिस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या .
या वेळी क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा बाजी केल्याने तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या वेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला होता.दानवे हे आपल्या पुर्व नियोजित कार्यक्रमास कोल्हापुरात आले होते.या वेळी त्यानी जनतेच्या तक्रारी ऐकून घेताना वरपे कुंटुंबांनीही झालेल्या मारहाणीची तक्रार केली.त्या वेळी दानवे यांनी पोलिस अधीक्षक यांना फोन करून त्यांचीही खरडपट्टी करून वरपे यांची तक्रार का दाखल केली नाही असा जाब विचारला.
या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके ,शाहुपुरीचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर ,जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाची तुकडी दाखल होऊन कार्यकर्त्याना शांतता राखण्याचे आव्हान केले.