गुरुवारी प्लेसमेंट ड्राईव्ह; जागेवरच नोकरीची संधी


      

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर जाधव :

कोल्हापूर :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गुरुवार दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी ΄सी बील्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा “प्लेसमेंट ड्राईव्हचे” आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

    या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 132 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. या पदांसाठी किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर, ‍अभियांत्रिकी पदविका, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.

             इच्छुक उमेदवारांनी 

https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपला बायोडाटा, सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार आणि उद्योजकांनी 0231-2545677 या दुरध्वनीवर संपर्क साधावा असेही श्री. माळी यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post