प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
कोल्हापूर : कागल तालुक्यातील केंबळी गावातील आजी शांताबाई यांच्या घरात पहिल्यांदाच वीज आली. वर्षानुवर्षे अंधारात चाचपडणाऱ्या शांताबाईंचें घर प्रकाशले अन् त्यांचे डोळे आनंदाने पाणावले.
आपल्या दोन मतिमंद मुलांसह शांताबाई संभाजी पाटील या केंबळी गावात राहतात. त्यांच्या घरी वीज नाही, ही बाब समजल्यानंतर सामाजिक बांधिलकीपोटी वीज कर्मचारी दोन पाऊल पुढे सरसावले. महावितरण बाचणी शाखा अभियंता पृथ्वीराज घोडके व वरिष्ठ तंत्रज्ञ दिगंबर चांदेकर यांनी खर्चाची जबाबदारी उचलली. ग्रामपंचायतीशी संपर्क साधून तातडीने कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अन् एका दिवसात शांताबाईंना वीज जोडणी सुविधा मिळाली
कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता श्री. दीपक पाटील, उपकार्यकारी अभियंता श्री.रत्नाकर मोहिते यांनी कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. इस्पूर्ली शाखा अभियंता श्री.सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री.सुधीर पाटील, श्री.शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ श्री.यशवंत पाटील, श्री. उत्तम कांबळे, श्री.प्रवीण पाटील, श्री. विश्वनाथ पाटील, मोला सय्यद यांनी वीज कर्मचाऱ्याना कौतुकाची थाप दिली.