जन आंदोलन मोर्चा काढण्याचा इशारा : दिपक केदार (ऑ.इ.पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष).
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कागल तालुक्यातील क.सांगाव येथील सागर सुबराव पुजारी याला तेथील 10 ते 15 लोकांनी डोक्यात रॉडने मारुन गंभीर जखमी केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून या घटनेची नोंद पोलिसांत झाली नसल्याचे समजते.त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात असून त्याची संबंधित डॉक्टरांनी कोणतेही उपचार केले नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
डोक्यात रॉडने मारल्यामुळे त्याच्या डोक्याचा सिटी स्कॅन अद्याप केला नसून त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली असताना उजव्या हाताचा एक्सरे काढ़ल्याचे सांगून त्याचा केस गंभीर असताना त्याला घरी घेऊन जाण्यास संबंधित डॉक्टरांनी सांगितले असल्याचे सांगितले.एका दलीत तरुणावर अशा प्रकारे अन्याय झाल्याचे समजताच ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांना समजताच त्यानी तात्काळ सीपीआर रुग्णालयात येऊन जखमी सागर पुजारी आणि त्यांच्या कुंटुबियाची भेट घेऊन विचारपूस करत घटनेची माहिती घेतली.
त्यानी तात्काळ डीन बोलवून त्याच्यावर व्यवस्थित रित्या उपचार करण्याच्या सूचना दिल्या आणि ज्या डॉक्टरांनी पेशंटला घरी घेऊन जाण्यास सांगितले त्याची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्याचे सांगितले.त्याची साडे आठ लाखांची फसवणूक करून दुसरयाच ठिकाणी जागा देऊन आणि त्या परिसरात 14 जणांची पक्की घरे अतिक्रमणात असताना फक्त एकट्याचेच घर पाडुन त्याची पत्नी गरोदर असताना त्याना दया न दाखविता त्याच्या आईचे ऑपरेशन झाले असताना त्याना तेथील लोकांनी धक्काबुक्की करत आमच्या विरोधात ऑट्रॉसिटीचा गुंन्हा दाखल करणार का आमच्यावर कोणाचा हात आहे का असे म्हणत सागरला मारहाण केली.
दोन दिवस झाले तरी येथील दलीताला मारहाण प्रकरणी कोणत्याही नेत्याने चौकशी केली नाही तसेच या जिल्हयाचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी दोन दिवस झाले तरी विचारपूस केली नाही त्यांना फक्त दलितांची मते चालतात पण दलितांना भेटायला लाज वाटते असे दिपक केदार म्हणाले असून पोलिस अधीक्षक यांना संबंधिताना अटक करून यात सहभागी असणारयावर 120 कलम लावण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती दिपक केदार यांनी दिली .जर अशा प्रकारे दलितावर या अन्याय होत असेल तर आणि जो पर्यन्त सागर पुजारीच्या मारेकरी असलेल्यांना अटक करून कारवाई होत नसल्यास तसेच दलितांच्यावर होत असलेला अन्याय सहन करणार नाही त्या साठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे दिपक केदार यांनी सांगितले.या वेळी त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी आणि सागर पुजारीचे नातेवाईक ऊपस्थित होते.