वरणगे पाडळी येथील घटना.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील एकाचा मुंबई येथे एका रुगणालयात मृत्यु झाला होता.त्याचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी वरणगे पाडळी येथे आणून अंत्यसंस्कारासाठी तेथील स्मशानभूमीत मृतदेह नेण्यात आला होता.
जमलेल्या नातेवाईकांनी आणि उपस्थितांनी शेवटचे पाणी पाजण्यासाठी मृताच्या चेहरयांवरील कापड बाजूला केले असता हा मृतदेह माझ्या पप्पाचा नव्हे असे म्हणत हंबरडा फोडला हे शब्द ऐकूण उपस्थित बुचकाळ्यात पडले प्रत्येक जण मृताचा चेहरा पाहू लागला .आणि संतापही व्यक्त करु लागले .
मुंबई येथील रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे नातेवाईकांना प्रचड त्रास सहन करावा लागला.नातेवाईकांनी या रुगणालयाचा तीव्र निषेध करून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.वरणगे येथील कृष्णात महादेव पाटील (46) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार चालू होते.त्यांच्यावर उपचार चालू असतानाच गुरुवारी त्यांचे निधन झाले.
या वेळी त्यांच्या सोबत त्यांची पत्नी मेघा आणि भाऊ सोबत होते.या वेळी मयत कृष्णातचा मृतदेह कापडात गुंडाळून नातेवाईकांच्या ताब्यात दिला असता तो मृतदेह रुग्णवाहिकेने वरणगे येथे आणण्यात आला.कापडात गुंडाळल्यामुळे ग्रामस्थांनी थेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेला.शेवटचे पाणी पाजण्यासाठी चेहरयांवरील कापड बाजूला घेताना हा मृतदेह कृष्णातचा नसून दुसरयांच व्यतीचा असल्याचे समजले वरून ग्रामस्थांत आणि नातेवाईकांच्यात एकच खळबळ उडाली.