जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्री. अडसूळ, सहायक संचालक फारुक बागवान, माहिती अधिकारी वृषाली पाटील व उपसंपादक रणजित पवार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

  याप्रसंगी  विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Post a Comment

Previous Post Next Post