प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे
कोल्हापुर-तावडे हॉटेल उड्डाण पुलावर दुचाकी स्वार संदिप राजाराम शिंदे (वय 41.रा.यादववाडी ,पु.शिरोली) याचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती गांधीनगर पोलिसांत झाली असून ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की,संदिप शिंदे हा टुल मशीन चे मार्केटिंग करत असून त्याचे गोकुळ शिरगाव येथे ऑफिस आहे.तो गोकुळ शिरगावहून आपल्या घरी जात असताना तावडे हॉटेल जवळील उड्डाण पुलावर येताच ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हर टेक करत असताना त्याच्या दुचाकीस धडक बसून तेथे असलेल्या संरक्षक भिंतींस आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती पोलिसांना समजताच गांधीनगर पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला .संदिप शिंदे हा विवाहीत असून त्याला दोन लहान मुले आणि एक भाऊ आहे.त्याचे मूळ गाव चिकुर्डे ता.वाळवा जि.सांगली येथील असून सध्या शिरोली येथे रहात होता .