लहान मुलांना दुचाकी चालविण्यास दिल्याने पालकांना पडलं महागात.

 57 पालकांच्या कडून 5 लाख 19 हजारांचा दंड वसूल.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- पालक आपल्या लहान मुलांना दुचाकी चालविण्यास दिल्या प्रकरणी वाहतूक शाखेने 57 पालकांच्या कडून 5 लाख 19 हजारांचा दंड आकारण्यात आला असून दंड न भरणारयांच्यावर न्यायालयात खटले दाखल करणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक  नंदकुमार मोरे यांनी पत्रकाद्वारे  दिली.

वाहन चालविण्यासाठी आरटीओ विभागाकडुन परवाना घेणे आवश्यक असून त्या साठी 18 वर्षे पूर्ण असण्याची गरज असते.मात्र काही पालकवर्ग आपला मुलगा पहिल्या वर्षी दहावी ,बारावी पास झाल्याने खुषीने दुचाकी घेऊन देतात.अशा परवाना नसलेल्या मुलांना वाहतूकीचे नियम माहिती नसल्याने काही जण वनवेतुन तर  काही जण भरधाव वेगाने चालवून अपघात होण्याची शक्यता असते अशा कारणाने दुसरयांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो.त्या मुळे याचा फटका पालकांना बसतो  . 

या प्रकाराला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने थेट पालकांच 25 हजारांचा दंड केला आहे..अशा बेदारकपणे वाहन चालविण्यारयां 57 अल्पवयीन मुलांच्यावर कारवाई करून त्यांच्या पालकांच्या कडून दंड आकारला आहे.आणि ज्या पालकांनी दंड भरण्यास नकार दिला त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करून दंड वसूल केला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post