प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-राजारामपुरी परिसरात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तलवार घेऊन दमदाटी करून दहशत निर्माण करणाऱ्या गौरव अशोक भालकर (23) राजू भिमा पंतोजी (23 .दोघे रा.सम्राटनगर) यांच्यासह संतोष रामसिंग गौतम (27.रा .राजारामपुरी) या तिघां जणाना राजारामपुरी पोलिसांनी अटक करून त्यांच्या कडील दोन तलवारी जप्त करण्यात आली आहेत.
अधिक माहिती अशी की,सम्राटनगर येथे अजिक्यतारा मंडळाजवळ रात्रीच्या सुमारास दोन तरुण हातात तलवारी नाचवत येणा -जाणारयांना दमदाटी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे हे तात्काळ पोलिस फौजफाट्यासह घटना स्थळी जाऊन दारु पिऊन तलवार नाचविणारा गौरव भालकर आणि राजू पंतोजी या दोघांना अटक करून त्यांच्या कडील तलवार जप्त केली.या प्रकरणी पोलिस कॉ.सचिन कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच नवशा मारुती मंदीर परिसरात रहाणारा संतोष गौतम याच्या घरात तलवार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तनपुरे मिळाली असता त्यांनी रात्री उशिरा त्याच्या घरी जाऊन झडती घेतली असता तलवार मिळुन आली पोलिसांनी तलवार जप्त करून संतोष याला अटक केली.अटक केलेले तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.शस्त्राचा धाक दाखवून लोकांना त्रास देणारया विरोधात कारवाई सुरुच रहाणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.