प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-लक्ष्मीपुरी पोलिसांनी बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी विपुल विश्वास आंबी आणि संदेश प्रकाश भोसले (दोघे रा.जुना बुधवारपेठ) या दोघांना बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या कडील हत्यारे जप्त केली आहेत.
अधिक माहिती अशी की,लक्ष्मीपुरी पोलिसांना जुना बुधवार पेठ येथील विपुल आंबी आणि संदेश भोसले यांच्याकडे हत्यारे असल्याची माहिती मिळाली असता या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील एक तलवार ,लोंखडी एडका आणि कोयता अशी हत्यारे जप्त करून त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवाई लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार , पोसई गिरीगोसावी ,पोहेकॉ संजय कोळी,पोकॉ.मंगेश माने,तानाजी दावणे आणि मपोकॉ तरन्नुम चौगुले यांनी केली.