मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार .
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातील कुडीत्रे येथे भर चौकात सकाळच्या सुमारास जंबा भगवंत साठे (वय 65.रा.कुडीत्रे) यांच्या डोक्यात लाकडी दांड्याचे फटके मारुन खून केला.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .
रतन बाळासो भास्कर (रा.कुडीत्रे). या संशयीताचा पोलिस शोध घेत आहेत.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.मयत जंबा साठे हे आज सकाळी आपल्या मित्रा समवेत गावातील चौकात बोलत थांबले होते.या वेळी संशयीत हल्लेखोर रतन येऊन जंबा बरोबर वाद घालत जंबाच्या डोक्यात दांड्याचा फटका मारताच ते रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर खाली कोसळले असता परत रतनने खाली पडलेल्या जंबाच्या डोक्यात फटके मारुन मारुन त्यांचा खून करून पळुन गेला.
जंबा याचा खून झाल्याचे समजताच नातेवाईकांनी घटना स्थळी धाव घेतली.या घटनेची माहिती करवीर पोलिसांना मिळाली असता पोलिस घटना स्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला.तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असता जो प्रर्यत आरोपीला अटक होत नाही तो प्रर्यत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला.या मुळे तेथे तणाव निर्माण झाल्याने करवीचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी नातेवाईकांची समजूत काढत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.ही खूनाची घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.
संशयीत हल्लेखोर हा दारुडा असून त्याला गांजाचे व्यसन आहे.त्याच्यावर पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता.तो कोणताही कामधंदा करीत नव्हता दारु पिऊन गावातुन फिरत असल्याचे समजते.