अण्णा चेंबुरी अशा टोपण नावाचा वापर
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर: अण्णा चेंबुरी असे टोपण नाव वापरून गावठी गट्टा हातात घेऊन मोबाईलवर रिल करत दहशत माजववणाऱ्यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. प्रसाद राजाराम कलकुटकी (वय २१, रा.तीनबत्ती चौक, दौलतनगर) असे त्याचे नाव आहे. शास्त्रीनगरातील रेड्याच्या टक्करीजवळ चुनेकर विद्यामंदिराच्या मैदानावर पोलीसांनी कारवाई केली. वाढदिवसा दिवशीच ही कारवाई पोलीसांनी केली. सोशल मिडीयावर रिल टाकताच त्याच्या हातात बेड्या पडल्याचे उपअधीक्षक अजित टिके यांनी सांगितले.
गावठी कट्टा घेवून इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर एक तरुण दहशत माजवित असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित तरुणाचा पोलीसांनी शोध सुरू होता. बुधवारी दुपारी हा तरुण शास्त्रीनगरातील चुनेकर विद्यामंदिर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीसांना समजली होती. पथकाने सापळा लावला होता. तो तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला संशयित म्हणून चौकशी केली.
त्याची अंगझडती घेतली. तेंव्हा त्याच्याकडे गावठी गट्टा मिळाला. '@ अण्णा चेंबुरी हॅप्पी बर्थडे डॉन ' असे लिहिलेला आणि गावठी कट्टा घेवून जातानाचे प्रसाद कलकुटकीचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ही पोस्ट पोलिसांच्या नजरेस आली. पोलिसांनी त्याला वाढदिवसादिवशीच अटक केली.
प्रसाद याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्याचे वडिल सुद्धा हाच व्यवसाय करतात. त्याच्या मित्राने दिलेला गावठी कट्टा घेवून त्याने मित्रांच्या सहाय्याने व्हिडिओ बनवून रिल केले होते. बुधवारी वाढदिवस होता म्हणून मित्रांनी ते व्हायरल केल्याचे त्याने तपासात सांगितले. उपनिरीक्षक अभिजित इंगळे, गौरव चौगले, हवालदार इनामदार या शहर पोलिस उपअधीक्षक पथकाने ही कारवाई केली.