लक्ष्मीपुरी येथे एका हार्डवेअर दुकानातुन दारु साठा जप्त करून चार लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- लक्ष्मीपुरी  पोलिसांनी तेथे असलेल्या प्रकाश हार्डवेअर दुकानात छापा टाकून गोवा बनावटीची दारु जप्त करून 4 लाख 35रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून भारत भुतपराय मेहता (रा.नागाळा पार्क) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,या परिसरात असलेल्या प्रकाश हार्डवेअर या दुकानात बेकायदेशीर दारु विक्री होत असल्याची माहिती मिळाली.त्या नुसार शनिवारी पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीच्या 25  वेगवेगळ्या कंपनीच्या असलेल्या दारु साठा मिळाला असता तो जप्त करून भारत मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post