प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- प्लॉटच्या क्षेत्रफळात तफावत असल्याने दुरुस्त करण्यासाठी लाचेची मागणी करणारा तलाठी स्वप्निल वसंतराव घाटगे (39.रा .रुकडी )आणि क्लार्क शिवाजी नागनाथ इटलावर (32.सध्या रा.क.बावडा राजू नायकवडी यांच्या घरी भाड्याने ) यांना लाचलुचपतच्या पथकाने कारवाई करून त्यांच्यावर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गु न्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
अधिक माहिती अशी की,तक्रारदार याच्या संबंधितांचे जयसिंगपूर येथे डवरी वसाहतीत प्लॉट आहे.त्या प्लॉटच्या क्षेत्रफळात तफावत असल्याने सदर क्षेत्रफळ दुरुस्त करून त्याचा उतारा मिळण्यासाठी जयसिंगपूर येथे तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता.तो अर्ज दुरुस्त करून उतारा देण्यासाठी 27हजार 500 रुपयांची लाचेची मागणी करत क्लार्क इटलावर यांनी तलाठी घाटगे यांनी सांगितल्या प्रमाणे तक्रारदाकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला याची माहिती देऊन तक्रार दाखल केली .या पथकाने तक्रारीची खात्री करून लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने तलाठी घाटगे आणि क्लार्क इटलावर या दोघांच्यावर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदाळ नाळे,पोलिस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.
कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी किंवा एंजटा मार्फत लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.असे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.