स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- शहरात गजबजलेल्या भाऊसिंगजी रोडवर असलेल्या सिंमदर ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकून फरार असलेल्या 1)पिंटू जयसिंग राठोड (25) 2)पुनमसिंग मानसिंग देवरा (21)आणि केतनकुमार गणेशराम परमार (सर्व रा.नुन ,राजस्थान) या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
अधिक माहिती अशी की ,26 जानेवारीला या तिघांनी भर दिवसा दरोडा टाकून 15 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लंपास करून फरार झाले होते.या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास तपास करण्याचे आदेश दिले होते.स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानी घटना स्थळी पहाणी करून तेथील कारागीरांची माहिती घेऊन तसेच शहरात येत असलेल्या आणि जात असलेल्या खाजगी गाड्यांची माहिती घेत त्या दृष्टिने पथके तयार केली .गुजरीत सराफ व्यावसायिकाच्याकडे कारागीर हे राजस्थान आणि प.बंगाल येथील असल्याची माहिती मिळाली असता काही पथके राजस्थानला तपासकामी पाठविले असता हा गुन्हा पिंटू जयसिंग राठोड याने आपल्या साथीदाराच्या मदतीने करुन ते पुणे बेळगाव मार्गावर असलेल्या हॉटेल निलकमल येथे असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बनावट किल्ल्या तयार करून चोरी केल्याची कबुली दिली अ सता त्यांच्या कडील चोरीस गेलेला 15 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करून पुढ़ील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांनी या पथकाचे अभिनंदन केले.ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ ,उपनिरिक्षक संदीप जाधव ,शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.