75 लाखांचे दागिने नेल्याने सरांफाची झाली घालमेल.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापुरातील गुजरी येथील काही सराफ व्यावसायिकांनी बंगाली कारागिरांना दिलेले 75 लाखांचे सोने त्या कारागिरांनी सोने घेऊन पलायन करण्याची घटना घडली असून या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरा प्रर्यत चालू होते.
गुजरीतील सराफांच्याकडे दागिने तयार करण्यासाठी परप्रांतिय कामगार असून ते या कामात तरबेज असल्याने येथील सराफ स्थानीक कारागिरा एऐवजी बंगाली ,राजस्थान अशा परप्रातिय कारागिरांना कामे देत असतात.हे कारागिर सरांफाचा विश्वास संपादन करून मोठ्या चलाखीने दागिने तयार करून देतो असे सांगून जास्तीत जास्त सोने सराफांच्या कडुन घेत असतात सराफही मोठ्या विश्वासाने सोने देत.हे कारागीर तेथेच भाड्याने रहात असल्याने काही चार पाच मोठ्या सराफांनी जवळ जवळ 75 लाखांचे सोने दिल्याचे समजते.त्यांच्याशी या सराफांनी संपर्क साधला असता त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने ते कारागीर सोने घेऊन पलायन केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा प्रकार बुधवारी रात्री घडला असून सोने दिलेल्या सराफांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती देऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.या घटनेने सराफांच्यात मोठी खळबळ उडाली आहे.