प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापुर शहरात जमाव बंदी असूनही सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्यारया दोन गटातील 15 जणांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास साळोखेनगर आणि वाल्मिकीनगर परिसरात दोन गटात वादावादी होऊन काहीच्या हातात लाकडी दांडके आणि काठ्या घेत हमरी तुमरी सुरु झाली.
ही माहिती जुना राजवाडा पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे आणि पोलिस कर्मचारी यांनी घटना स्थळी जाऊन दोन्ही गटाना शांत रहाण्याचा आव्हान केले .मात्र पोलिसांच्या देखतच एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करू लागले .ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत जमावाला पांगविले .या बाबतची तक्रार पोलिस हेड कॉ.शिवाजी पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिल्याने दोन्ही गटातील 15 जणांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----शाळकरी मुलाच्या डोक्यावरून रिक्षाचे चाक गेल्याने जखमी.
कोल्हापुर- रिक्षाचे चाक डोक्यावरून गेल्याने शाळकरी मुलगा आदित्य ललीत पाटील (14.रा.जरगनगर) हा सकाळी दहाच्या सुमारास घराकडे जात असताना सायकल घसरून खाली पडला असता पाठिमागून आलेल्या रिक्षा चालकाने रिक्षाचे चाक त्याच्या डोक्यावर घालून न थांबता तसाच पुढ़े निघून गेला.
जखमी आदित्य याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्या रिक्षा चालका विरोधात आदित्यचे वडील ललीत शंकर पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.