प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
यड्राव - घरच्यांनी लग्नास विरोध केल्याने हातकंणगले तालुक्यातील तारदाळ येथे प्रेमी युगलानी रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली.किरण अमोल कांबळे (18)आणि साहिल राजेंद्र कांबळे (25.रा.दोघेही टाकवडे ता.शिरोळ) अशी त्या दोघांची नावे आहेत.
हा प्रकार सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला .या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात उशीरा प्रर्यत दाखल करण्याचे काम चालू होते.साहील हा तारदाळ येथे एका फौड्रीत कामास होता त्याच बरोबर पेंटींगची कामेही घेत होता.तर किरणही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती.या दोघांच्या प्रेमास दोन्ही घरच्या कडुन विरोध असल्याने किरण ही घरच्याना कॉलेजला जाते म्हणत बाहेर पडली .साहील आणि किरण पाचच्या सुमारास दुचाकीवरुन तारदाळ येथे परीसरात बराच वेळ बोलत बसल्याचे समजते.काही वेळातच कोल्हापूरहून आलेल्या रेल्वे खाली दोघांनी मिळून उडी मारून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला.