प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कळंबा येथे कात्यायनी कॉम्प्लेक्समध्ये किरकोळ कारणावरून पूजा अविनाश फडके (वय ३०) यांना शेजारी राहणा-या दोघांनी मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २३) सकाळी अकराच्या सुमारास घडला. याबाबत पूजा यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार शिवाणी फुटाणे (वय २३) आणि देवेंद्र जावळे (वय ४५, देघे रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
...............
राजेंद्रनगरात दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणास मारहाण
कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका सराईत गुंडाने तरुणाला लोखंडी सळीने मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. २२) रात्री राजेंद्रनगर येथील मुख्य रस्त्यावर घडला. मारहाणीत सतीश प्रभू भिसे (वय ३४, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी गुंड मिथुन गुलाब काकडे (रा. राजेंद्रनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला. काकडे याच्यावर यापूर्वी मारहाण आणि दमदाटीचे गुन्हा दाखल आहत.
...............
जप्त मालमत्तेवर जबरदस्तीने ताबा ; चौघांवर गुन्हा
कोल्हापूर : एल. अँड टी. फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज टिंबर मार्केट येथील कर्जदाराने थकवले होते. यामुळे जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार कंपनीच्या अधिका-यांनी करवीर मंडळ अधिका-यांच्या उपस्थितीत तारण मालमत्ता सील केली होती. संबंधित कर्जदाराने १२ फेब्रुवारीला जबरदस्तीने सील तोडून मालमत्ता ताब्यात घेतली. याबाबत कंपनीचे अधिकारी शेखर शांताराम काळे (वय ४४, रा. पुणे) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कर्जदार आशा विलास सकटे, अमित विलास सकटे, वैशाली संतोष वायदंडे आणि संतोष मधुकर वायदंडे (सर्व रा. शहाजी वसाहत, टिंबर मार्केट, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.