मोठी बातमी : जीमच्या तरुणांना शरीर सदृढ़ दिसण्याठी घातक औषधाचा पुरवठा करणाऱ्या दोघां जीम चालकास अटक.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- कंळबा परिसरात असलेल्या एस.प्रोटीन्स आणि एस.फिटनेस या दोन्ही जीमच्या चालकांना मेफ़ेनटेरमाइन सल्फेट ही घातक औषधांचा पुरवठा केल्या प्रकरणी प्रशांत मोरे (34.रा.मोरेवाडी) आणि ओंकार अरुण भोई (रा.आपटेनगर) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून 39.992रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या दोघांच्या विरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्याना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ हे करीत आहेत.

 अधिक माहिती अशी की,जीमला जाणारयां तरुणांना शरीर सदृढ़ दिसण्यासाठी घातक औषधांचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांना मिळाली होती.ही बाब गंभीर असून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास दिल्या होत्या.या पथकाने तपास करीत असताना कंळबा परिसरात असलेल्या एस.प्रोटीन्स एस.फिटनेस या जीम सेंटर वर छापा टाकून जीमचा चालक प्रशांत मोरे यांनी या दोन्ही जीम मी चालवित असून कामास असलेला ओंकार भोई यांच्या मदतीने मेफ़ेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शन देत असल्याची कबुली दिली अ सता त्या दोघांना अटक करून त्या औषधांच्या 64 बाटल्या आणि त्यासाठी लागणारे सीरीज व इतर असा 39 हजार 992 रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post