जुना राजवाडा पोलिसांनी मा.आयुक्तसो (कोमनपा) यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावावर संबंधित विभागाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- एका मंडळाला वादग्रस्त पोस्टर छपाई करून त्याच्यावर नाव आणि संपर्क नंबर नसल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने ओवी डिजीटलचा परवाना रद्द केला आहे.
अधिक माहिती अशी की,श्री शाहू स्टेडियम येथे कोल्हापूर स्पोर्टस् असोशिएनच्या वतीने फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या वेळी वेताळमाळ तालीम आणि शिवाजी पेठ यांनी ब गटातुन अ गटात प्रवेश केला.यामुळे काही कार्यकर्त्यानी गांधी मैदान येथे प्रवेशद्वाराजवळ एक पोस्टर लावले होते.त्यावर "जंगल भी वही है,शिकारी भी वही है,लेकीन शेर बदल गया है " असा वादग्रस्त मजकूर छापून तसेच दोन गटात वाद निर्माण होईल असा उल्लेख करून त्या पोस्टरवर एका बाजूला नाव आणि संपर्क नंबरचा उल्लेख नसल्याने आणि संबंधित विभागाला याची माहिती न दिल्याने जुना राजवाडा पोलिसांनी हे पोस्टर कुठे छापून घेतले याची माहिती घेतली असता या पोस्टरचे डिझाईन सुवर्णा ग्राफिक्स (कौस्तुभ वशीकर) मंगळवार पेठ यांनी केले असून याची छपाई शाहुपुरीतील ओवी डिजीटल (निखील नागवेकर ) यांनी केल्याची माहिती मिळाली अ सता त्यांनी आयुक्तसो यांच्याकडे परवाना रद्द साठी अहवाल तयार करून पाठविला होता.याची सं बंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन परवाना रद्द केल्याची कारवाई करण्यात आली.या अगोदरही वादग्रस्त मजकूर छापल्या प्रकरणी लक्ष्मीपुरीतील स्टार डिजीटलवर प्रतिबंध कारवाई केली होती.
येथुन पुढ़े आगामी सण,उत्सव किंवा कोणत्याही कार्यक्रमात वादग्रस्त मजकूर छापल्यास संबंधित विभागाकडुन प्रिंटीग प्रेसच्या चालक /मालकावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.