प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरातील विविध भागांतील रिकाम्या जागांची महानगरपालिकेकडून स्वच्छता सुरू परंतु यापुढे रिकाम्या जागे मध्ये कचरा आढळून आलेस जागेच्या मालकांचेवर दंडात्मक कार्यवाही होणार.
इचलकरंजी शहरात विविध भागात अनेक ठिकाणी खाजगी रिकाम्या जागा आहेत. या रिकाम्या जागेमध्ये परिसरातील नागरिकांच्या कडून कचरा टाकला गेल्याने अशा ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच याच अनुषंगाने महानगर पालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनीअशा रिकाम्या जागा शोधून त्याठिकाणची स्वच्छता तातडीने करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांना दिले होते. या आदेशानुसार महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आज शहरातील विविध ठिकाणी रिकाम्या जागांची स्वच्छता तातडीने सुरू करणेत आलेली आहे.
रिकाम्या जागा स्वच्छ करण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे परंतु परत सदर ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही यासाठी सदर रिकाम्या जागेच्या (प्लॉट) मालकांना नोटीस देऊन आपल्या रिकाम्या जागेमध्ये कचरा टाकण्यास प्रतिबंध आहे , टाकल्यास इचलकरंजी महानगरपालिकेच्या आदेशानुसार सोशल मीडिया वर फोटो टाकून दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल अशा आशयाचा सूचना फलक जागा मालकांनी स्वखर्चाने सात (७) दिवसांच्या आत लावणेबाबत कळविणेत येणार आहे. तसेच यापुढे ज्या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये कचरा आढळून येईल त्या जागेच्या मालकांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि त्या जागेच्या मालकांना स्वखर्चाने आपल्या जागेची स्वच्छता करावी लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे महानगरपालिके कडून सदर नोटीसद्वारे कळविणेत येणार आहे.
त्याचबरोबर अशा रिकाम्या जागेवर सदर जागा मालकांनी सुचना फलक लावण्यात आले नंतरच्या फोटोसह याबाबतचा अहवाल सादर करणेचे आदेश आयुक्तांनी संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षक यांना दिले आहेत.