प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२७ कुसुमाग्रजांचे साहित्य हे नव्या पिढीला प्रेरणा देणारे साहित्य आहे. त्यांच्या साहित्यातून मानवी जीवनमूल्याची नवी दृष्टी मिळते. मराठी भाषा ही प्राचीन इतिहास असलेली व शेकडो वर्ष चालत आलेली भाषा आहे.म्हणून तिला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे.
आपण मराठी भाषिकांनीही मराठी भाषेचा सतत आग्रह धरला पाहिजे. आपले बोलणे ,ऐकणे, वाचणे मराठी ठेवले पाहिजे. या निमित्ताने समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने कुसुमाग्रजांच्या साहित्यासह भाषाविषयक ग्रंथांचे भरवलेले प्रदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून साहित्य व भाषा विषयक जाणीवा समृद्ध होण्यास मदत होईल असे मत प्रा. डॉ.एफ.एन. पटेल यांनी व्यक्त केले.तेसमाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने मराठी राजभाषा दिन अर्थात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन कार्यक्रमात बोलत होते.
सौदामिनी कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले.प्रा . डॉ.पटेल यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच यावेळी मराठी भाषा विषयक ग्रंथ आणि कुसुमाग्रजांचे काव्यसंग्रह ,नाटके यांचे प्रदर्शन भरवण्यात आलेले होते. या प्रदर्शनालाही अनेकांनी दिवसभरामध्ये भेट दिली.दत्ताजीराव कदम आर्ट्स अँड सायन्स कॉलेज इचलकरंजीच्या इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनीही ग्रंथालयाला भेट दिली. यावेळी पांडुरंग पिसे, राहुल माने, अर्श पटेल,सुनंदा कुलकर्णी, संदीप मोरे ,आनंदा जिरगे ,पवन काटकर, नंदा हालभावी ,अश्विनी कोळी,एस.एस.हरगणे, दीपक देवकर ,अक्षता करड्याळकर ,अवंतिका खराडे, कोमल ठोंगे, रिया कोठारे, श्रेया मोळे ,विजया पंग आदींची उपस्थिती होती