प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : संजय गांधी समितीचे एकूण 8 हजार लाभार्थ्यांचे खाते पोस्टात आहे. त्यापैकी ७५६ लोकांचे पैसे खात्यामध्ये पोस्टमन लोकांनी अकाउंट काढताना स्पेलिंग व अकाउंट नंबर मध्ये अनेक चुका केल्यात, त्या चुकीचा भुर्दड लाभार्थ्यांना होत आहे. एकीकडे नोव्हेंबर पर्यंतचे पैसे १६ हजार लाभार्थी जे के.डी.सी. बँकेत आहेत, त्यांना ती रक्कम मिळाली आहे.
पण पोस्टातील लाभार्थीना रक्कम का दिली नाही तसेच एक महिन्यापूर्वी पोस्टातील ८ हजार लाभार्थ्यांचा डाटा पोस्टातील अधिकारी यांनी जिल्हा पोस्ट अधिकारी यांना दिला होता. जेणेकरून त्यांनी लाभार्थ्यांची पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी तो डाटा चेक करून त्यांनी परत संजय गांधी समितीकडे पाठवणे आवश्यक होते. परंतु ते त्यांनी पाठवले नसल्यामुळे संजय गांधी अध्यक्ष अनिल डाळ्या व तहसीलदार मनोज येतवडे यांनी कोल्हापूर जिल्हा पोस्ट अधिकारी, संतोष सिंग यांची चांगलीच कान उघडणी केली. तेव्हा महिना अखेर पर्यंत सर्व यादी दुरुस्त करून पाठवतो व ७५६ लोकांचे देखील पैसे दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत स्पेलिंग मिस्टेक व नंबर दुरुस्त करून लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवतो, असे समितीला आश्वासन दिले.
के.डी.सी. बँकेत हयातीचा दाखला घेतला जातो, परंतु पोस्टात हयातीचा दाखला न घेतल्यामुळे ते पैसे मयत झालेल्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होते. व मयत नंतरही मोबाईलच्या ओटीपी द्वारे ते पैसे लाभार्थ्यांचे अनेक नातेवाईक किवा एजेंट ते पैसे काढून घेतात. परंतु केडीसी बँकेत ओटीपी नसल्यामुळे ते काढता येत नाही. पोस्टात लाभार्थ्यांना पासबुक दिले जात नाही. लाभार्थी वयस्कर, निराधार व अशिक्षित असल्यामुळे किती पैसे जमा झाले व ओटीपी द्वारे कोणी काढले हे लवकर समजत नाहीत. त्यामुळे अनेक लाभार्थी हे सतत संजय गांधी समिती मध्ये संपर्क करतात व त्यांचे ससेहालपट होते. तसेच पोस्टात खाते उघडताना संजय गांधी कार्यालयामधील मंजुरी पत्र घेतले जात नाही. त्यामुळे सदर कार्यालयाचे लाभार्थी आहेत हे समजून येत नाहीत.
अनेक वेळा खाते क्रमांक बरोबर असताना देखील NA असा शेरा देवून लाभार्थ्यांची यादी परत का पाठवतात, असा प्रश्न अनिल डाळ्या यांनी पोस्ट अधिकारी कोल्हापूर जिल्हा यांना केला. पोस्टातील रक्कम मोबाईल अॅप वरून उचलता येते. इकडील कार्यालयात वृद्ध लाभार्थी आहेत. त्यांचे नातेवाईक यांचे मोबईल नंबर दिला जातो. ते नातेवाईक परस्पर रक्कम उचलतात सदर लाभार्थी यांना अनुदान मिळत नाही, असे लाभार्थी रोज कार्यालयात येतात. पोस्टाचे स्टेटमेंट घेतले असता अनुदान उचलल्याची नोंद असते. पण लाभार्थी यांना मिळालेली नसते. त्यामुळे लाभार्थ्यांना व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सं
जय गांधी कार्यालयात एक दोन महिन्यात मिटींग होत असतात व नवीन लाभर्थी मंजूर होतात. त्यामुळे लाभार्थी वाढ होत असतात, जर प्रत्येक महिन्याचे अनुदान शासनाकडून येत असते त्यामुळे जर प्रत्येक बिलात वरील अडचणी सतत निर्माण झालेस कार्यालयीन कामकाज करणेस अडचणीचे होत आहे. पोस्टाचे कोणतेही पाठविलेली रक्कम परत लेखी स्वरूपात नसलेने वारंवार आलेल्या रक्कमांचा ताळमेळ / कॅशबुक लिहिणेस अडचणी निर्माण होत आहेत.
इचलकरंजी संजय गांधी कार्यालयात १ लिपिक व १ अव्वल कारकून रिक्त असलेने व अपूरे मनुष्यबळ आहे. व सदर कार्यालयात एकूण ३०,००० चे वरती लाभर्थी असलेने कामकाज करताना अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व समस्या पोस्ट अधिकाऱ्यांच्या निदर्शनास समितीने आणून दिले. यावेळी समिती सदस्य कोंडीबा दवडते, सुखदेव म्हाळकर, महेश ठोके, तमन्ना कोटगी, संजय नागुरे, जयप्रकाश भगत, महेश पाटील, सलीम मुजावर, सौ. सरिता आवळे आदी उपस्थित होते.