प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषक विविध क्रीडा सांस्कृतिक 2024 स्पर्धेचे उद्घाटन आज शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार सुरेश हाळवणकर, तसेच जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, मशाल ज्योत प्रज्वलित करुन मोठ्या जल्लोषात स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. युवा अध्यक्ष जयेश बुगड यांनी मशाल ज्योत घेऊन रॅलीला सुरवत केली. यावेळी शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले उपस्थितीत होते.
या नमो चषक स्पर्धेचे उद्घाटन स्केटिंग स्पर्धा घेऊन झाली. या स्पर्धेमध्ये इचलकरंजी, बेळगाव, गडहिंग्लज, शिराळा कागल तालुक्यातील 70 स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये लहान चीमुले स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभाग घेतले होते. क्वॉड श्रेणी मध्ये इचलकरंजीचा हर्षवर्धन दबडे यांने प्रथम क्रमांक पटकावला. तर बेळगावच्या श्री रोकडेने, द्वितीय क्रमांकावर राहिला. तर तिसऱ्या क्रमांकावर बेळगावचाच सौरभ साळुंखे पटकाविला. इनलाईन श्रेणी मध्ये गडहिंग्लजच्या साईश पोतदार, प्रथम आला. इचलकरंजीचा पियुष म्हेतर द्वितीय स्थानावर राहिला. गडिंग्लजचा तृतीय स्थानावर सोशल कांबळे राहिला.
यावेळी बोलताना हाळवणकर म्हणाले की नमो चषकाचा शुभारंभ इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात युवा मोर्चाच्या माध्यमातून होणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध क्रीडा व सांस्कृतिक खेळांची नियोजन करण्यात आले आहे. नमो चषकाच्या माध्यमातून सुदृढ भारत निरोगी भारत राहो अशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची संकल्पना राहीली आहे आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून भविष्यातील भारत घडवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. त्यात खेळ महत्त्वाचा आहेच. त्याचबरोबर या खेळाच्या माध्यमातून लोकांना जोडणे त्यांच्याशी संवाद साधने तसेच खेळामुळे खेळाडूचे शरीर निरोगी राहते या स्पर्धेमध्ये तरुणांना व विद्यार्थ्यांना महिलानां खेळण्यास मिळणार असलेचे सांगितले.
यावेळी जेष्ठ नेते सुनील महाजन, सं.गां.नि.समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या, अशोक स्वामी, उदय बुगड, तानाजी पोवार, मनोज साळुंखे, जहांगीर पटेकरी, मारुती पाथरवट आदी मान्यवरांचा युवा मोर्चा पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक आशिष खंडेलवाल, नितीन पडियार, अभिषेक वाळवेकर रणजीत यादव, रविंद्र घोरपडे, हेमंत वरुटे, प्रविण बनसोडे, मनोज तराळ, अर्जुन शिंदे, श्रेयस गट्टाणी, यश वायचळ, प्रथमेश लाखे, आदित्य पाटील, विराज इंगळे, नागेश फुटाणे, सुरज आडेकर, उमेश गोरे, राहुल गागडे, अभिषेक चिंचणी, कृष्णात थाला, युवराज पुजारी, ओंकार पुजारी, राकेश वडार, केतन जावळे, जिवक कांबळे, विशाल पाटील, शुभम भोसले, कृष्णा राठी, योगेश निर्मळ, विपुल खोत, वैभव लिगाडे, विकास कांबळे, हरीश लाटकर, सुजय पवार, पृथ्वीराज हुणुले, त्याचबरोबर सरचिटणीस राजेश रजपुते, बालाकृष्ण तोतला, उपाध्यक्ष सतिश पंडित, महेश पाटील, उमाकांत दाभोळे, अॅड.भरत जोशी विनोद काकांनी, दिलीप मुथा, अरुण कुंभार, प्रविण पाटील, संजय नागुरे, राहुल तेलसिंगे आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.