प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेच्या राणी बागेस अचानक भेट देऊन पाहणी केली.
राणी बागेमध्ये भेटी वेळी अस्वच्छता आढळुन आलेने उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर यांना तातडीने बागेच्या दैनंदीन स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणेचे आदेश दिले होते. त्याचबरोबर उद्यान विभागाकडील कामकाजाच्या दृष्टीने येत असलेल्या समस्या जाणुन घेतल्या.
या आदेशानुसार आज रविवारी उद्यान विभागाकडील सर्व कर्मचारी यांनी राणी बागेची सामुहीक स्वच्छता केली. याच प्रमाणे उद्या सोमवारी शहीद भगतसिंग उद्यानाची स्वच्छता सामुहीक रित्या करणेत येणार आहे.