भारतीय जनता पार्टी चे "गाव चलो अभियान "

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

भाजपतर्फे देशभरात `गाव चलो अभियान' राबविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर भाजपकडून शहरासह ग्रामीण भागात ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी 'घर चलो अभियान' राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी पत्रकाद्वारे महिती दिली. भाजपच्या शहर येथील कार्यालयात गाव चलो अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी हाळवणकर यांनी प्रमुख पदाधिकारी यांना गाव चलो अभियानाची माहिती देत अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शन केले 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला दहा वर्षांची कामगिरी पूर्ण झाली आहे. सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली. त्यात गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील महायुती सरकारनेही महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरातील प्रत्येक बूथवरील लाभार्थीपर्यंत पोचविण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाला ४ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून, ते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या ११ फेब्रुवारी रोजीच्या स्मृतीदिनापर्यंत सुरू राहील. पंडित दिनदयाळ यांच्या स्मृतींना अभियान समर्पित केले जाणार आहे. या अभियानात पक्षाचे शहरातील माजी खासदार, आमदार, माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, प्रकोष्टचे संयोजक, वॉरियर्स, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मंडल अध्यक्ष आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या अभियानात सहभागी कार्यकर्त्यांना `प्रवासी कार्यकर्ता' म्हणून संबोधण्यात येणार आहे. तर शहरातील एक हजार मतदारांच्या बूथवरील लाभार्थीपर्यंत पोचण्यात येणार आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी आदी सर्व माहिती मतदारांपर्यंत पोचविण्यात येईल. तसेच मोदीची  गॅरंटी काय आहे  हे प्रत्येक नागरिकाला माहितीपत्राद्वारे सांगण्यात येईल, यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या सह

जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले शहराध्यक्ष पै अमृत भोसले ,महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, महिला आघाडी अध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे, मिश्रीलाल जाजू, जयेश बुगड युवा मोर्चा शहराध्यक्ष, जेष्ठ नेते पांडुरंग म्हातुंगडे सरचिटणीस बालकृष्ण तोतला ,सरचिटणीस उत्तम चव्हाण, राजेश रजपुते, उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे, महेश पाटील, दिपक पाटील, अंनिस महालदार ,अरुण कुंभार (संयोजक) विनोद कोराणे, अरविंद शर्मा, सो निता भोसले पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स महिला आघाडीसहभाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post