प्रेस मीडिया लाईव्ह :
जागतिक महिला दिन आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज बुधवार दि. २८फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या निर्देशानुसार हिरकणी कक्ष स्थापन करणेत आला.
सदर कक्षाचा शुभारंभ आयुक्त यांचे सुचनेनुसार महानगरपालिका सेवेत नव्याने रुजू झालेल्या पायल माणगावे आणि ऐश्वर्या गंगावणे या महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते आणि उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत करणेत आला.
त्याचबरोबर प्रामुख्याने महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच इतर सर्व विभागाकडील महिलांच्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते करणेत आला. या शिबिरात डॉ मिनल पडीया यांनी महानगर पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार रक्त तपासणी केली.
या प्रसंगी सहा.आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, महिला बाल विकास अधिकारी सीमा धुमाळ, उप अभियंता राधिका हावळ, सहा. लेखापाल किरण मगदूम, ग्रंथपाल बेबी नदाफ, विधी अधिकारी खदिजा सनदी, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, तेजस्विनी सोनवणे, अलका पाटील यांचेसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.