प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस, थोर विचारवंत ,स्वातंत्र्य सैनिक कालवश आचार्य शांतारामबापू गरूड यांच्या ९७ व्या जन्मदिनानिमित्त समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
आचार्यांच्या प्रतिमेला इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे अध्यक्ष व प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांडूरंग पिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले ,आचार्य शांताराम बापू गरुड आणि त्यांच्या सहकाऱ्यानी ज्या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी समाजवादी प्रबोधिनीची स्थापन केली. त्या मूल्यांसाठी अधिक जोमाने, अधिक सातत्याने व गतिशीलतेने काम करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. यावेळी प्रसाद कुलकर्णी ,सौदामिनी कुलकर्णी, अन्वर पटेल, श्रीधर काजवे, विठ्ठल पवार, मुर्तजा पठाण,मारुती रायकर,नंदा हालभावी, अश्र्विनी कोळी आदी उपस्थित होते.