संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने हेरले येथे 394 वी शिवजयंती साजरी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

हेरले प्रतिनिधी / संदीप कोले 

 महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील संयुक्त बौद्ध  समाजाच्या वतीने आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. 

हा कार्यक्रम आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आला होता. हे कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन  सामाजिक कार्यकर्त्या वनिता कदम, अर्पिता कांबळे,करुणा कुरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस प्रियंका कुरणे, ग्रामपंचायत सदस्या गीतांजली चौगुले यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला .

 या कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायत सदस्या निलोफर खतीब, उर्मिला कुरणे, माजी सभापती जयश्री कुरणे,  रसिका चौगुले, सुकुमार खाबडे,अरविंद कदम,विवेक चव्हाण, अक्षय कटकोळे, अशोक उलसार, भीमराव उलसार,कृष्णात कटकोळे  व अन्य  बौद्ध समाज बांधवांनी  पुष्प  अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उर्मिला कुरणे यांनी केले. त्यावेळी बौद्ध समाजाचे बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post