प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
हेरले (तालुका हातकणंगले) येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सहारा फाउंडेशनच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यामध्ये हेरले ग्रामपंचायत च्या विद्यमान सदस्या निलोफर इब्राहिम खतीब यांना उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले . ऊर्जा बळ स्फूर्ती प्रेरणा मिळावी व भविष्यात एक पाऊल पुढे टाकून काम करावे यासाठी ही निवड सहारा फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाते.
हा सोहळा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कबनूर इथल्या शिवनंदी मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला.यावेळी संस्थापक अध्यक्ष पापालाल सनदी, रेश्मा सनदी, परवेज सनदी, महेश कांबळे, उमेश जाधव, सुरेश कुंभार, मुनीर जमादार, विजय देसाई, महेश शिवुडकर, जैद भोकरे,युसुफ मकानदार, सचिन कांबळे, महेश पाटील, सचिन सुतार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.