प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी : संदीप कोले
माता रमाई आंबेडकर यांची 126 वी जयंती हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन हेरले ग्रामपंचायत सदस्या निलोफर इब्राहिम खतीब व उर्मिला प्रकाश कुरणे यांच्या हस्ते करण्यात आले व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, हिरालाल कुरणे, माजी पंचायत समिती सभापती जयश्री जयवंत कुरणे, सामाजिक कार्यकर्ते इब्राहीम खतीब यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला. त्यावेळी सामुदायिक पंचशील व विधायक पंचशील घेण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते कृष्णात कटकोळे यांनी केले. व आभार उर्मिला कुरणे यांनी मानले या कार्यक्रम प्रसंगी समस्त बौद्ध समाजातील महिला व बांधव यांनी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना वंदन व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी संयुक्त बौद्ध समाजातील बौद्ध बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.