स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापूर जिल्हयात होत असलेल्या घरफोडी करणारा चोरटा सुमित महादेव निकम (रा.गजबरवाडी ,बेळगाव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.
कोल्हापुर जिल्ह्यात आणि शहरातील होत असलेल्या घरफोडी चोरीच्या प्रकरणात होत असलेली वाढल्याने पोलिस त्रस्त झाले होते.पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या .त्यानुसार तपास करीत असताना या पथकास कर्नाटकातील पोलिस रेकॉर्डवरील सराईत चोरटा सुमित महादेव निकम (रा.गजबरवाडी ,ता.निपाणी जि.बेळगाव) याने केल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी लोणार गल्ली ते मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करून त्याच्या कडील सोन्या -चांदीचे दागिने असा एकूण 6 लाख 78 हजार 400/रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याला पुढ़ील तपासासाठी मुरगूड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने मुरगूडसह राधानगरी ,शहापूर ,आजरा, कुंरुदवाड या ठिकाणी घरफोडी केल्या असून त्याच्या विरोधात महाराष्ट्रासह कर्नाटकातही 20 चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पो.उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.