प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
तारदाळ तालुका हातकणंगले येथील मयुर दीपक कांबळे यांचा अनैतिक संबंभातुन ठार मारल्याची कबुली तीन जणांनी शहापूर पोलीसाना दिली. याप्रकरणी विनायक चौगुले व दोन अल्पयीन मुलांवर शहापूर पोलीस ठाण्यात खुणसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती खोतवाडी -तारदाळ मार्गावर असलेल्या आरोही बार जवळ मयूर दिपक कांबळे यांचेवर अनैतिक संबंधातून चिडून साधारणता २२ ते २३वार करण्यात आले होते.
यावेळी स्वप्निल बाबुराव वराळे हा भांडण सोडवताना तिघांनी त्यास धमकी देऊन पळवुन लावले.त्यानंतर तिघांनी मयूर कांबळे यांच्या गळ्यावर, हातावर,पायावर,डोक्यावर,चेहऱ्य यावर, सपासप वार करून ठार मारले.
या प्रकरणी स्वप्निल वराळे यांच्या फिर्यादीनुसार विनायक चौगुलेसह दोन् अल्पवयीन मुलावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वप्नील वराळे यांच्या फिर्यादीच्या अनुषंगाने नागरीक हक्क संरक्षण विभागाचे डीवायएसपी फडतरे साहेब व किरतरे मॅडम यांनी आज मयूर कांबळे यांच्या घरी भेट देऊन पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.याबाबतअधिकचा तपास डीवायएसपी समीरसिंह साळवे साहेब करीत आहेत.