स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
इंचलकरंजी - शांतीनगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत परशुराम उर्फ प्रशांत भैरव कुराडे (वय 28.रा.इंदिरानगर ,इंचलकरंजी ) याचा खून केल्या प्रकरणी अजय उर्फ नवनाथ बापू काशिद (24.रा.नमाजते मळा,इंचलकरंजी) आणि आदम उर्फ संभा महमद मुजावर (20.रा.नेहरुनगर ,इंचलकंरजी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.
अधिक माहिती अशी की, शांतीनगर परिसरात स्मशानभूमी असून येथे प्रशांत कुराडे याचा अनोळखी व्यक्तीने खून केला होता.याची फिर्याद राकेश धुमाळ यांनी इंचलकरंजी पोलिसांत दिली होती.इंचलकजीत एका आठवड्यात दोन खून झाल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.या गुन्हयाचा तपास करीत असताना या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती घेऊन हा खून पोलिस रेकॉर्डवरील अजय काशिद आणि आदम उर्फ संभा मुजावर यांनी केला असून हे दोघे बाहेर पळुन जाण्याच्या तयारीत असून ते जयसिंगपूर एसटी स्टँडवर असल्याची माहिती मिळाली.
या पथकाने जयसिंगपूर एसटी स्टँड परिसरात त्यांचा शोध घेत या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानी खून केल्याची कबुली दिली अ सता त्या दोघांना अटक करून पुढ़ील तपासासाठी इंचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांचा तिसरा साथीदार साहील चव्हाण हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील ,इंचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे आणि संदीप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.