नऊ हजारांची लाच घेताना सहाय्यक फौजदार ताब्यात.

  लाचलुचपत पथकाची कारवाई.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- गुन्हयात अटक न करण्यासाठी 9 हजारांची लाच घेताना हुपरी पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार दिलीप योसेफ तिवडे (52 रा.कदमवाडी सरस्वती हॉस्पिटल जवळ,को)यांना लाचलुचपतच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरा प्रर्यत चालू होते .

अधिक माहिती अशी की,तक्रार याचे कुत्रे चावल्या वरुन शेजारयांशी भांडण झाले होते.या दोघांच्यावर हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.याचा तपास सहाय्यक फौजदार तिवडे यांच्याकडे असल्याने तिवडे यांनी तक्रारदाराकडे या गुन्हयात अटक  न करण्यासाठी 10 हजारांची लाचेची मागणी केली होती.यात तडजोड करत 9 हजार देण्याचे ठरवले.दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.या पथकाने याची खातर जमा करुन सापळा रचून तिवडे याला 9 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडून कारवाई केली.

ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक मा.सरदाळ नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुखे ,संजय बंबग्रेकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post