कोल्हापुरात पोलिसांनी सुलोचना पार्कात केलेल्या कारवाईत सहभागाची कबूली.
प्रेस मीडिया लाईव्ह:
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- काही दिवसांपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील या परिसरातील सुलोचना पार्कात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून या अगोदर दोघां जणाना अटक करून त्याच्या कडील यंत्र सामुग्री जप्त केली होती.
यांना गर्भपातासाठी एंजटगिरी करणारा डॉ.युवराज निकम (34.रा.वैभववाडी ,सिंधुदुर्ग ) याला अटक केली आहे.या डॉक्टरनी कस्टमर पाठविल्याची कबुली दिली आहे.या गुन्हयातील बनावट डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील (रा.बालिंगा ) याच्यासह अमित डोंगरे आणि कृष्णात जासूद यांना अटक करून त्या नंतर आणखी दोघांना अटक केली होती.या गुन्हयात बाहेरील रुग्ण पाठविणारा डॉक्टरचा सहभाग असल्याची माहिती मिळाली असता करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युसुफ इनामदार यांनी सिंधुदुर्ग येथे जाऊन डॉ.युवराज निकम यांना अटक केली.एका महिला ग्राहकास पाठविल्याची कबुली दिली आहे.