प्रेस मीडिया लाईव्ह :
भोसरी : अमर दांडे
भोसरी आठवडी बाजार आहे की चोरट्यांचा अड्डा असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे , आज शुक्रवार असल्याने भोसरी येथे भाजी मंडई मध्ये आजू बाजूचे सर्व खेडे वरचे लोक हे बाझार करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात आणि इथ मोठी एमआयडीसी असल्यामुळे राहायला पण बरेच स्टेट ची लोक राहतात यूपी , एमपी , बिहार ची. आज दुपारच्या सुमारास येथे बाझार साठी येणाऱ्या 4 लोकांचा मोबाईल भुरट्या चोरांनी गायब केले , या प्रकारामुळे दररोज येणारे नागरिकां मध्ये भीतीच वातावरण पसरले आहे .
या बाबत नागरिकांचे म्हणणे आहे की हे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सतत घडत आहेत या कडे कोणी लक्ष देत नाही व कारवाई करत नाहीत , हे असेच सुरू राहिले तर बाजार बंद होईल तरी भुरट्या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे या बाबत यावर प्रशासनाने लक्ष द्यावे