संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी ; भरत शिंदे
अतिग्रे:घोडावत विद्यापीठात संजय घोडावत यांचा 59 वा वाढदिवस 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.यावेळी बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर उपस्थित होता.याप्रसंगी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले उद्योजक गिरीश चितळे, आरोग्य सेवक डॉ.नाथानिएल ससे, समाजसेवक राहुल व दीपक कदम, टेनिसपटू ऐश्वर्या जाधव यांना'एसजीयू आयकॉन 2024' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी श्रेणिक घोडावत यांनी घोडावत समूहाचा मागील वर्षीचा अहवाल सादर केला.यामध्ये स्टार एअर,स्टार लोकल मार्ट,रिन्यूएबल एनर्जी, रेनॉल विंड एनर्जी शैक्षणिक समूह याच्या प्रगती विषयी व भविष्यकालीन योजना विषयी माहिती दिली.
याप्रसंगी संजय घोडावत यांनी अभिनेता अर्जुन कपूर यांचे स्वागत केले.तसेच कपुर घराण्याशी मित्रत्वाचे नातेसंबंध असल्याचा उल्लेख केला. समाजाच्या उन्नतीसाठी अविरत कष्ट घेणाऱ्या एस जी यु आयकॉन पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे त्यांनी अभिनंदन केले. समाजाचे आपण देणे लागतो त्यासाठी दातृत्वाची भावना वाढीस लागायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली.घोडावत समूहाच्या प्रगतीचा आलेख मांडताना त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी संजय घोडावत यांच्या कर्तुत्वावर आधारित संजय आवटे यांनी संपादित केलेल्या तेजोमय या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते झाले. एस जी यु आयकॉन पुरस्कारांचे वाचन डॉ.विराट गिरी यांनी केले. या कार्यक्रमास सौ.नीता घोडावत, श्रेया ,सलोनी, विजयचंदजी,जयचंदजी, राजेशजी व राकेशजी घोडावत आणि सर्व घोडावत कुटुंबीय उपस्थित होते.तसेच याप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहून जयसिंगपूर , सांगली,कोल्हापूर,या परिसरातील मित्र व नेतेमंडळींनी शुभेच्छा दिल्या. विश्वस्त विनायक भोसले,अतुल शिंदे,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोहन तिवडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डिसूजा यांनी मानले.
संजय घोडावत यांच्यावर बायोपिक निघाला तर ती भूमिका मला करायला आवडेल अशी इच्छा अभिनेता अर्जुन कपूरने व्यक्त केली.विद्यापीठाचा परिसर हा भारतात एक नंबर आहे असे मत त्यांने मांडले. यावेळी आपल्या नृत्याच्या तालावर सर्व विद्यार्थ्यांना त्याने थिरकायला भाग पाडले.