प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे.
अतिग्रे . तालुका हातकणंगले येथे वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उदघाटन मोठ्या उत्साहात आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडले
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी शाखा अतिग्रे अध्यक्षपदी अमित होवाळे उपाध्यक्षपदी समीर शिंदे यांच्या निवडीचे पत्र वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी सर यांच्या हस्ते देण्यात आले.या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी अॅङ चिंतामणी कांबळे यांनी उपस्थित सर्वच गावाहून आलेल्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विजय सूर्यवंशी महासचिव.अभिजीत नागावकर सचिव. महेश कांबळे आयटी प्रमुख. सागर शिंदे आयटी प्रमुख. इंद्रजीत सूर्यवंशी आयटी प्रमुख. रुपेश लिगाडे संघटक. सदाशिव सूर्यवंशी संघटक. शितल सूर्यवंशी संघटक. यांचीही अतिग्रे शाखेच्या पदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान तिळवणी गावचे उपसरपंच आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड यांना देण्यात आले.
उदघाटन प्रसंगी अतिग्रे गावचे प्रशांत मधाळे सर यांनी प्रास्ताविक व आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अतिग्रे गावचे माजी उपसरपंच .संदीप सूर्यवंशी यानी कार्यक्रमास आलेल्या सर्वच कार्यकर्ते व मान्यवर यांचे आभार मानले.या कार्यक्रमास मोहम्मद अफरोज मुल्ला( युवा प्रदेश सदस्य व जिल्हा निरिक्षक) विश्व्जीत कांबळे (राज्य सदस्य सचिव)मिलिंद सनदी सर (जिल्हाद्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी) अमित कुमार माळवे (युवा जिल्हा उपाध्यक्ष.तालुका निरिक्षक ) मनिषा ताई कांबळे (महिला जिल्हा उपाध्यक्ष )अॅङ चिंतामणी कांबळे .अतिग्रे गावचे माजी उप सरपंच संदीप सूर्यवंशी .प्रशांत मधाळे सर.अशोक सुर्यवंशी.प्रकाश सूर्यवंशी.इंद्रजित सुर्यवंशी.जावेद दबडे .अतुल संदी सर .अश्पाक देसाई.संताजी खाबडे.गणेश कांबळे .गौतम दिवान.अविनाश साकेत .विश्वनाथ कांबळे .अजित चौगुले.योगेश विटेकरी.लखन कांबळे .अभिनंदन तराळ.युवा उद्योजक संदीप कांबळे .अदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थीत होते.