प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे येथील हनुमान जीमचे संस्थापक मालक सारंग पाटील यानी आपले वडील हिंद केसरी पैलवाण कै.प्रमोद आकाराम पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त अतिग्रे येथे रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते.या मध्ये अतिग्रे व बाहेरील गावातून काही रक्त दात्यांनी रक्तदान केले.तसेच अतिग्रे व पंच क्रोशीतील लोकानी आपले डोळे तपासून घेतले .
ज्याना मोतीबिंदू चा त्रास आहे अश्या लोकांना मोफत ऑपरेशन करुन देण्याचे कार्य सारंग पाटील करत आहेत.यावेळी शिबिरास आलेल्या मान्य वरांणी आपली मनोगत व्यक्त केलीत ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याना भेट वस्तू देण्यात आल्या.
आभार मानताना सारंग पाटील म्हणाले की माझे थोरले बंधू संग्राम पाटील व मी आमच्या वडीलांचा आदर्श डोळ्या समोर ठेउन सामाजिक काम करत आहोत.अम्ही दोघे भाऊ आमच्या वडीलांच्या आशिर्वादाणे असेच चांगली सामाजिक कामे करुन वडीलांचा वारसा पुढे चालवू
यावेळी अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड .उप सरपंच बाबासो पाटील सदस्य भगवान पाटील.विनायक पाटील (तात्या) संतोष कांबळे (पत्रकार) धुळोबा पाटील.राम पाटील.लखन कांबळे .विजय गोंधळी , भरत शिंदे आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.