प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
चोकाक तालुका हातकणंगले येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गातील चोकाक ते अंकली मार्गात चोकाक येथे प्रस्तावित मार्गासाठी मार्किंग करून हद्दीची दगड लावण्यात येत होते अद्याप कोणत्याही प्रकारचे भूसंपादन झालेले नसताना हद्दीचे दगड का लावत आहात चोकाक ते अंकली येथील बाधित शेतकरी व्यावसायिक मिळकतदार यांनी चारपट रक्कम मिळालीच पाहिजे ती अद्याप स्पष्ट झालेली नाही तर तुम्ही हद्दीचे दगड लावत आहात असा जाब प्रधिकरण विभागाचे अधिकारी अजित महात्मे यांना विचारून धारेवर धरले.
हा सर्व प्रकार अतिग्रे करांच्या लक्षात आल्यानंतर चोकाक येथे जाऊन राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील व अतिग्रे चोकाक गावचे शेतकरी एकत्र येऊन जे हद्दीचे लावलेले दगड ते काढून नेण्यास भाग पाडले व अधिकारी यांना असे सांगण्यात आले की आम्हाला बाधित भूसंपादनाचा मोबदला चारपट मिळालाच पाहिजे त्याशिवाय आमच्या जमिनीत हस्तांतरित करू देणार नाही
यावेळी उपस्थित कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील, माजी सैनिक तानाजी पाटील ,आनंदा पाटील, भिकाजी पाटील, कृष्णात गुरव, महेश कवणे, प्रफुल पाटील ,पत्रकार संतोष कांबळे ,अनिल पाटील ,तेजपाल पाटील ,भरत शिंदे ,तसेच अतिग्रे व चोकाक मधील शेतकरी उपस्थित होते