प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे श्री गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री गणेश चारिटेबल ट्रस्ट, शाहू आघाडी ,व सर्व गणेशभक्त अतिग्रे यांच्या वतीने श्री गणेश जयंती सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला
यावेळी श्री गणेशाची विविध फुलांनी आकर्षक पूजा बांधण्यात आली होती सकाळी ठीक सात वाजता श्रींच्या मूर्तीस महाभिषेक घालण्यात आला सकाळी दहा वाजता हनुमान मंदिर भजनी मंडळ अतिग्रे, श्री हरी मंदिर भजनी मंडळ अतिग्रे, अंबामाता महिला भजनी मंडळ रूकडी यांच्यावतीने भजन संपन्न झाले दुपारी बारा वाजून 17 मिनिटांनी श्री गणेश जन्मकाळ सोहळा व महाआरती करण्यात आली व सायंकाळी ठीक सात वाजता महाप्रसाद घालण्यात आला.
यावेळी श्री गणेश जयंती सोहळ्यासाठी विद्यमान आमदार माननीय राजू बाबा आवळे, जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉक्टर माननीय अशोकराव माने, माजी आमदार माननीय राजीव आवळे, अतिग्रे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, व सर्व सदस्य ,अतिग्रे येथील सर्व संस्था ,तरुण मंडळे ,अतिग्रे व पंचक्रोशीतील गणेश भक्त महिला ,पुरुष, व लहान बालकांनी त्या सर्वांनी या गणेश जयंती सोहळ्याचा लाभ घेतला या गणेश जयंतीसाठी देणाऱ्या देणगीदारांचे श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट व राजश्री शाहू आघाडी यांच्या वतीने आभार मानण्यात आले