30 विद्यार्थ्यांना 99 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे : जेईई मेन्स परीक्षेमध्ये संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी ने घवघवीत यश संपादन केले.अकॅडमीच्या 30 विद्यार्थ्यांनी 99% पेक्षा अधिक गुण मिळवून जेईई परीक्षेत उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली.
या मध्ये तनय कक्लीया (99.97) अक्षता काब्रा (99.82)श्रीवर्धन इजारे(99.79)दीक्षा डांगे(99.75) हर्ष मलगट्टे (99.71) या विद्यार्थ्यांनी विशेष गुण प्राप्त केले.
याबद्दल बोलताना अकॅडमीचे संचालक वासू सर म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या कष्टामुळे आणि त्यांना मिळालेल्या उत्तम मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले आहे. अध्यक्ष संजयजी घोडावत यांच्या दूरदृष्टीमुळे येथील विद्यार्थ्यांसाठी अकॅडमीची निर्मिती करण्यात आली. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात परंतु काहीच विद्यार्थी यामध्ये यश मिळवतात. या अकॅडमीने आतापर्यंत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. पालकांच्या अकॅडमी वरील विश्वासामुळे सातारा येथे अकॅडमी व मिरज परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ऑलंम्पियाड स्कूल सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अकॅडमीचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी वासू सर व यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.