अतिग्रे गावात भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार खरेदीसाठी नागरिकांची गर्दी



प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

  अतिग्रे तालुका हातकणंगले येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना हातकणंगले अतिग्रे येथे अंगणवाडी च्या चिमुकल्यांचा भरला आठवडी बाजार या उपक्रमाचा शुभारंभ अतिग्रे गावच्या ग्रामपंचायत सदस्या सौ कलावती गुरव व सौ दिपाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या चिमुकल्यांच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला ,फळभाजी, खाद्यपदार्थ ,चिंचा ,आवळे ,लोणचे ,घरगुती बनवलेले गोड पदार्थ ,अशा विविध प्रकारचे या बाजार स्टॉल होते गावातील नागरिकांनी त्याचा लाभ घेतला व खरेदी केली व मुलांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले. 

 यावेळी या उपक्रमामध्ये अंगणवाडी क्रमांक 98 ,99 ,189 ,279 ,188, 190, अशा एकूण सहा अंगणवाडीचा सहभाग होता या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सहकार्याने या बाल चमूंचा बाजार अतिशय उत्साही झाला यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ कलावती गुरव यांनी सांगितले की या बाजारामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक चांगल्या प्रकारचे हास्य निर्माण झाले होते यातूनच मुलांना ज्ञान प्राप्त होते व गणिताच्या आकडेवारी समजली जाते व त्या चिमुकल्यांचा पालकांचेही अभिनंदन केले

    यावेळी उपस्थित ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड, उपसरपंच बाबासाहेब पाटील सदस्य भगवान पाटील  सदस्या  कलावती गुरव  ,आक्काताई शिंदे ,दिपाली पाटील, छाया पाटील ,कल्पना पाटील तसेच अंगणवाडी सेविका स्नेहल पाटील, पुष्पा भावके,सारिका मुसळे ,प्रियदर्शनी चौगुले ,संजीवनी कांबळे, मंगल बिडकर ,मदतनीस कल्पना बिडकर ,सारिका हेर्ले, सविता कांबळे ,धनश्री शिंदे, सविता बिडकर ,गौरी पाटील, व सामाजिक कार्यकर्ते राम पाटील तसेच सर्व चिमुकल्यांचे पालक नागरिक उपस्थित होते

   

Post a Comment

Previous Post Next Post